सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईच्या प्रश्नावर शिवसेनेने मुंबईभर आंदोलन छेडले आहे. सत्तेत असूनही शिवसेना ‘मित्रपक्ष’?? भाजपाला टार्गेट करत असल्याने भाजपाला चांगलीच मिर्ची झोंबलीय. त्यातही शिवसेना कार्यकर्त्यांकडून नेहमीच्या आक्रमकपणे ‘एवढी माणसं कशाला? मोदी यांच्या मयताला’ अशी तिखट नारेबाजी करण्यात येत असल्याने भाजपाच्या जखमेवर जणू मिठ चोळले गेलेय.
विरोधाला विरोध ठिक आहे. पण एवढ्या टोकाला जाऊन नारेबाजी करणे भाजपा नेत्यांना रूचलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनही सोशल मीडियावरून उलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. एकूणच सेना, भाजपात सोशल वाॅर सुरू झाले आहे.
महागाईविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना आमदार अनिल परब आणि आ. निलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यामुळे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ट्विटरवरून शिवसेनेवर पलटवार करत ‘ज्या माणसाच्या जिवंतपणी घोषणा दिल्या जातात, तो दिर्घायुषी होतो, असे म्हणतात. जे मोदींच्या नावाने जिंकून आले, खुर्चीवर बसले, तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात. कुणाच्या पायऱ्या चाटत राजकारणात जिंवत राहण्याची धडपड करायला मी काही अनिल परब नाही.’ अशा जहरी शब्दांत आ. अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
कुणाच्या पायर्या चाटत राजकारणात जिवंत राहण्याची धडपड करायला मी काही अनिल परब नाही!
— ashish shelar (@ShelarAshish) September 23, 2017
ज्यांची एकही निवडणूक लोकांमधून लढवण्याची औकात नाही. अशांनी माझ्या सारख्या सातत्याने लोकांमधून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीवर बोलू नये.
— ashish shelar (@ShelarAshish) September 23, 2017
ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात तो दिर्घायुषी होतो असे म्हणतात.पण नवरात्रीत"शिमगा"करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे!
— ashish shelar (@ShelarAshish) September 23, 2017
तर, भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी देखील इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
.@KiritSomaiya shares his views about today's protest by @ShivSena. Watch this video to know more.@bjpmumbai @BJP4Maharashtra @BJP4India pic.twitter.com/RZuUKQEbxe
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) September 23, 2017
आशिष शेलार हे मातोश्रीच्या पायऱ्या चाटत चाटत आले आहेत. त्यांनी २०१४ च्या आधीचा काळ आठवावा. साहेबांच्या भेटीसाठी ते तासंतास मातोश्रीबाहेर वाट बघत बसायचे, हे विसरू नये. त्यामुळे कोण कोणाच्या जीवावर मोठं झालंय हे लोकांना माहीत आहे.
- आ. अनिल परब, शिवसेना
हेही वाचा -
'अच्छे दिन नही, महंगाईके बुरे दिन...' महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)