Advertisement

'अच्छे दिन नही, महंगाईके बुरे दिन...' महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर


'अच्छे दिन नही, महंगाईके बुरे दिन...' महागाईविरोधात शिवसेना रस्त्यावर
SHARES

पेट्रोल, डिझेलचा उडालेला भडका... त्यात भाजीपाल्याच्या दरवाढीचा तडका... महागाईने सर्वसामान्य हैराण झाला असून 'अच्छे दिन हेच का?' असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. हाच मुद्दा 'इन्कॅश' करत शिवसेना सत्तेत असूनही केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे.

महागाईविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या १२ ठिकाणी शिवसेनेने शनिवारी मोर्चाचे आयोजन केले. सकाळपासून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरून नरेंद्र आणि देवेंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांच्या अटकसत्राला दुपारपासून सुरूवात झाली आहे.


अनिल देसाई, नीलम गोऱ्हे पोलिसांच्या ताब्यात 

सीएसटी भागात खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेने महागाईचा प्रतिकात्मक राक्षसही आणला होता. यावेळी अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तर शिवसेना विभाग क्र.११ दक्षिण मुंबई येथे महागाईविरोधात निदर्शने करणाऱ्या आ. नीलम गोऱ्हे, आ. अजय चौधरी, आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, अरविंद भोसले, माजी आ. दगडू सकपाळ यांनाही पोलिसांनी अटक केली.



मोदी सरकार हाय हाय...

नरेंद्र सरकार, देवेंद्र सरकार हाय हाय... सारख्या घोषणांनी शिवसैनिकांनी मोर्चाचा परिसर दणाणून टाकला. मोर्चातील या घोषणांची चांगलीच चर्चा मुंबईकरांमध्ये आहे. अशाच काही घोषणा.

  • अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय
  • महागाईमुळे जनता त्रस्त, मोदीजी मात्र परदेशी दौऱ्यांत व्यस्त
  • इतकी माणसं कशाला, मोदींच्या मयताला
  • महागाई वाढवणारे सरकार चले जाव
  • कहा गये अच्छे दिन, यह तो महंगाई के बुरे दिन



मोर्चामध्ये पुरूषांसह महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग आहे. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, फेटे घालून हे कार्यकर्ते सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसताहेत. तर महिला कार्यकर्त्यांनी भगव्या साड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे पहावे तिकडे भगवा-भगवाच रंग दिसतो आहे.


भाज्यांच्या माळा

महागाईचा निषेध करण्यासाठी मोर्चात सहभागी झालेल्यांनी गळ्यात चक्क भाज्यांच्या माळाा घातल्या आहेत. तर सिलिंडरची प्रतिकृतीही गळ्यात अडकवली आहे. धान्याची पाकिटे पोस्टरवर लावली आहेत.



मोर्चाची ठिकाणे अशी :

  1. वांद्रे -
    कलानगर, म्हाडा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब याच्या नेतृत्वाखाली मोर्चा. या मोर्चात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आरोग्य मंत्री डाॅ. दिपक सावंत, आ. तृप्ती सावंत आदींचा सहभाग
  2. नॅशनल पार्क ते बोरीवली -
    आ. प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा, विभागप्रमुख प्रकाश कारकर यांच्यासह अन्य शिवसैनिकांचा समावेश
  3. जोगेश्वरी रेल्वे स्थानक -
    आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
  4. कुर्ला, नेहरू नगर -
    आ. मंगेश कुडाळकर करताहेत मोर्चाचे नेतृत्व
  5. घाटकोपर-अंधेरी लिंक रोड -
    विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
  6. कांदिवली पूर्व ते पश्चिम -
    विभागप्रमुख कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
  7. दादर रेल्वे स्थानक -
    विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
  8. भांडुप पश्चिम -
    विभाग प्रमुख दत्ता दळवी यांच्याकडे मोर्चाचे नेतृत्व
  9. चेंबूर नाका -
    नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको
  10. करी रोड -
    नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
  11. दक्षिण मुंबई -
    विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन



हेही वाचा -

शिवसेना दिवाळीपूर्वीच फोडणार फटाका?

शिवसेनेचे 20 ते 22 आमदार फुटणार - रवी राणा

भांडूप पोटनिवडणूक : अखेर उमेदवार निश्चित!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा