Advertisement

भांडूप पोटनिवडणूक : अखेर उमेदवार निश्चित!


भांडूप पोटनिवडणूक : अखेर उमेदवार निश्चित!
SHARES

भांडुपमधील प्रभाग 116 मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेविका मिनाक्षी पाटील आणि भाजपाच्या वतीने विद्यमान नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या स्नुषा जागृती पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे सादर केले.


प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक

भांडुपमधील प्रभाग 116 च्या काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे या रिक्त जागी येत्या 11 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने आमदार अशोक पाटील यांची पत्नी मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.



शुक्रवारी सकाळी एस विभाग कार्यालयात शिवसेनेकडून मिनाक्षी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार अशोक पाटील, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, विभागप्रमुख दत्ता दळवी तसेच नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.


भाजपाकडून प्रमिला पाटील मैदानात

भाजपाच्या वतीने प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी दुपारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सरदार तारासिंग, भाजपा गटनेते मनोज कोटक तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


23 सप्टेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस

मात्र, या मतदार संघात काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका असल्या, तरी अद्यापही काँग्रेसच्या वतीने उमेदवार जाहीर झालेला नाही. काही उमेदवारांची नावे चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. परंतु उमेदवारी अर्ज भरण्याची शनिवारी 23 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने याठिकाणी कोणताही उमेदवार दिला जाणार नसल्याचे दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे.



हेही वाचा - 

मुंबई पालिकेतली समीकरणं बदलणार?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा