शिवसेनेची स्वस्त दरात भाजी विक्री

 Girgaon
शिवसेनेची स्वस्त दरात भाजी विक्री
शिवसेनेची स्वस्त दरात भाजी विक्री
शिवसेनेची स्वस्त दरात भाजी विक्री
See all

गिरगाव - पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवसेना,युवासेना आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने रविवारी गिरगावमध्ये शाखा क्रमांक 216 च्या वतीने स्वस्त दरात भाजीपाला विक्री करण्यात आली. नाशिक येथून 7 शेतकऱ्यांनी अनेक प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. या भाजी विक्री केंद्राचे उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या सौ. मीना कांबळी यांच्याहस्ते झाले. यावेळी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, शखिल भाई, अल्केश म्हेत्री, अमोल कावले आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आणलेली भाजी हातोहात विकली गेल्यानं शेतकरी आनंदी झाले. तसेच अशा प्रकारे भाजी विक्री झाली तर आमच्यावर असलेल्या आर्थिक संकटावर मात करता येईल असे शिवाजी बढे या शेतकऱ्याने सांगितले.

Loading Comments