शिवसेनेने राखला लालबागचा बालेकिल्ला


SHARE

लालबाग - शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबाग, परळ, शिवडीतील प्रभाग क्रमांक 200 ते 206 मधून शिवसेनेचे सहा आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा आपल्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यात यशस्वी झाली आहे. शिवसेनेने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी काळाचौकी येथील साईबाबा पथ या मार्गावर जल्लोष आणि फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली.

प्रभाग क्रमांक 200 मधून उर्मिला पांचाळ, प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव, प्रभाग क्रमांक 203 मधून सिंधू मसुरकर, प्रभाग क्रमांक 204 मधून अनिल कोकील, प्रभाग क्रमांक 205 मधून दत्ता पोंगडे, प्रभाग क्रमांक 206 मधून सचिन पडवळ, असून प्रभाग 201 मधून काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया मोरे विजयी झाल्या आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या