राजकारण्यांसाठी नियम नाहीत का?

  Dahisar
  राजकारण्यांसाठी नियम नाहीत का?
  मुंबई  -  

  दहिसर - वॉर्ड क्रमांक 6 मध्ये शिवसेनेने अांबावाडी, रतननगर येथे रॅलीचे आयोजन केले होते. शिवसेना उमेदवार हर्षद प्रकाश कारकर यांची ही रॅली होती. या रॅलीत नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये अनेक बायकर्सनी हेल्मेटच घातले नव्हते. तर काही बाइक्सवर तीन-तीन कार्यकर्ते बसले होते. मात्र यावर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे एरवी सामान्य प्रवाशांना हटकून त्यांच्यावर कारवाई करणारे पोलीस रॅलीवर मात्र कारवाई करताना दिसत नव्हते. मग नियम फक्त सामान्यांसाठीच असतात का असाच प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.