Advertisement

शिवसेना कार्यकर्त्यांचा किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला

किरीट सोमय्या यांनाही जखमा झाल्या आहेत.

शिवसेना कार्यकर्त्यांचा किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला
SHARES

किरीट सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला (Kirit Somaiya attack by Shiv Sena Worker) करण्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक (Stone attack) करण्यात आली.

किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात गेले होते. राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलिस (Khar Police station) स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावं लागलं. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली.

किरीट सोमय्या यांनाही जखमा झाल्या. त्याच्या हनुवटीतून रक्त वाहत होतं. तर त्यांच्या शेजारी बसलेल्याला माणसाच्या हातातही तुटलेल्या खिडकीच्या काचा घुसल्या होत्या. या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांवर गंभीर आरोप केलेत. मला जीवे मारण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

आधी वाशिम, मग पुणे आणि आता खारमध्ये मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. तर दुसरीकडे शिवसैनिकांच्या अंगावर सोमय्यांनी गाडी घातल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किरीट सोमय्यांविरोधात खार पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे.



हेही वाचा

नील सोमय्यांवर तुर्तास कठोर कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे आदेश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा