महापालिकेवर फडकला भगवा

CST, Mumbai  -  

सीएसटी - मुंबई महापालिकेवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर विराजमान होणार असल्यामुळेे शिवसेनेने शक्तीप्रदर्शन केलं. या निमित्ताने संपू्र्ण सीएसटी परिसर भगवामय झाला होता. निवडणुकीच्या काळात भाजपाने शिवाजी महाराज्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागितला होता, मात्र शिवसेनेने महापालिका मुख्यालयाबाहेर शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून महाराजांचा आशीर्वाद हा शिवसेनेलाच आहे असे दाखवलंय. तसंच नवनिर्वाचित महापौरांच्या स्वागतासाठी ढोल पथक ही सज्ज झाले होते.

Loading Comments