शिवसेनेची घोषणा...मुंबईकर मात्र संमिश्र

मुंबई - आम्ही चुनावी जुमला बोलत नाही तर वचनामा देतो असा टोला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. तसेच मुंबईकरांना आम्ही करमुक्त करणार असल्याची घोषणाही त्यांनी गुरुवारी केली. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करता येणार असल्याचे सांगत 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. सध्या जरी भाजपासोबत युतीची चर्चा सुरू असली तरी उद्धव ठाकरेंनी वचननाम्याची घोषणा केली. तसेच या योजनेचे नाव बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना असणार आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांना देखील उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेला मुंबईकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. काही लोकांनी निवडणुका आल्याने अशा घोषणा केल्याचे सांगितले. तर काहींनी याचा फायदा मुंबईकरांना होईल अशी प्रतिक्रिया दिली.

Loading Comments