Advertisement

लता मंगेशकरांच्या स्मारकाच्या राजकारणात शिवाजी पार्कचा बळी नको- संदिप देशपांडे

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विट करत पक्षाची भूमिका मांडली.

लता मंगेशकरांच्या स्मारकाच्या राजकारणात शिवाजी पार्कचा बळी नको- संदिप देशपांडे
(File Image)
SHARES

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शिवाजी पार्कात लता मंगेश यांचे स्मारक उभारण्याची मागणी भाजपा तथा कॉंग्रेसकडून केली जात आहे. शिवाय लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून राजकीय पक्षांमध्ये वादविवाद सुरू आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या वादात उडी मारली असून, शिवाजी पार्कातील लता मंगेशकर यांच्या स्मारक उभारण्याला विरोध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे खेळाचे मैदान आहे. ते खेळासाठी राहायला हवे. भाजप-शिवसेनेच्या राजकारणात मैदानाचा बळी घेऊ नका, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क इथं भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या मागणीला ठाम विरोध केला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विट करत पक्षाची भूमिका मांडली. ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादरवासीयांनी खेळण्यासाठी अनेक वेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवले आहे. तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका, ही विनंती,’ असे देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आहे. मग, तिथे लता मंगेशकर यांचे स्मारक का नको, या मागणीला अर्थ नाही. हे खेळाचे मैदान आहे, ते तसेच राहायला हवे. भाजप आणि शिवसेनेतील कूरघोडीच्या राजकारणात मैदानाचा बळी देऊ नका', असं देशपांडे यांनी म्हटलं.

मुलांच्या खेळाच्या मैदानावर आपले स्मारक व्हावे, हे लतादीदींनाही आवडले नसते. त्यांचे खेळावर प्रेम होते, क्रिकेटवरचे त्यांचे प्रेम सर्वश्रूत आहे. याच शिवाजी पार्कने सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू देशाला दिले. उद्या मैदानच राहिले नाही तर नवे सचिन घडणार कसे,’ असा प्रश्नही संदीप देशपांडे यांनी केला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा