Advertisement

सायनमध्ये सेना-भाजपा कार्यकर्ते भिडले

शिवसेनेच्या प्रयत्नांनी आणि महापालिका निधीतून रस्त्याचे काम होत असून त्याचे उदघाटन महापालिका अधिकारी आणि सेनेचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, भाजपाचे आमदार तमील सेलवन यांनी तिथे कार्यकर्त्यांसह धाव घेत उदघाटन करण्याचा प्रयत्न केला.

सायनमध्ये सेना-भाजपा कार्यकर्ते भिडले
SHARES

सायन-प्रतीक्षा नगर येथील रस्त्याच्या उदघाटनावरून स्थानिक शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेच्या प्रयत्नांनी आणि महापालिका निधीतून रस्त्याचे काम होत असून त्याचे उदघाटन महापालिका अधिकारी आणि सेनेचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, भाजपाचे आमदार तमील सेलवन यांनी तिथे कार्यकर्त्यांसह धाव घेत उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले.


काम एकाचं, श्रेय भलत्याचंच!

सायन-प्रतीक्षा नगर येथील रस्त्यांचे कंत्राट स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर त्याच्या भूमिपूजनाचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे उद्घाटन सकाळी होणार होते. शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे व मंगेश सातमकर यांच्या प्रयत्नांनी या रस्त्याचे काम होत आहे. त्यामुळे ठोंबरे यांच्या नातवाच्या हस्ते श्रीफळ वाढवून हे भूमिपूजन केले जाणार होते. यासाठी शिवसेनेचे मंगेश सातमकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार होते. परंतु, त्याआधीच भाजपाचे आमदार तमिल सेलवन हे पदाधिकाऱ्यांसह तिथे धडकले. आणि हे काम आपल्या प्रयत्नांनी होत असल्याचे सांगत उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपाच्या या पदाधिकाऱ्यांना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. यावेळी दोन्ही गटांच्या लोकांकडून जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली.


सामंजस्याने मिटला वाद

मात्र, यात दोन्ही गटांकडून हाणामारी होण्याची परिस्थिती उद्भवली होती. परंतु, पोलिस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याने हे प्रकरण हातात घेतले आणि वेगळे वळण लागू दिले नाही आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना तिथून उद्घाटन न करताच जायला लावले.



हेही वाचा

'सिहांच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली' - शिवसेना


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा