Advertisement

हे शिवसेना, भाजपाचे अपयश - विरोधी पक्षनेते


हे शिवसेना, भाजपाचे अपयश - विरोधी पक्षनेते
SHARES

मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याने मुंबईकरांचे जे हाल झाले, याला सर्वस्वी शिवसेना-भाजपा जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. यंदा नालेसफाईचे काम योग्यप्रकारे झाल्याचा दाखला शिवसेना-भाजपा युतीने दिला होता. परंतु, त्यानंतरही मुंबईत पाणी तुंबून मुंबईकरांना त्रास झाला. हे सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाचेही अपयश असल्याचा आरोप राजा यांनी केला.

गणेशोत्सवातच गौरीच्या आगमनाच्या दिवशी मुंबईला पाण्याखाली लोटण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. नालेसफाईचे काम सुरू झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने या नाल्यांची पाहणी करून चांगले काम झाल्याचे प्रमाणपत्र दिले होते. खुद्द पक्षप्रमुखांसह त्यांनी नाल्यांची पाहणी केली होती. याशिवाय सत्ताधारी पक्षांसह भाजपानेही योग्यप्रकारे नाल्यांचे काम झाल्याचा दावा केला होता. परंतु, त्यानंतरही मुंबईत पाणी तुंबले. बुधवारीही ताशी 50 मि. मी पावसाचीच चर्चा केली जात आहे. आतापर्यंत सुमारे हजार कोटी रुपये खर्च करूनही मुंबई तुंबली हेच मोठे आश्चर्य असून याला सर्वस्वी शिवसेना, भाजपा आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.


भाजपाचे आमदार, पदाधिकारी उतरले रस्त्यांवर

सकाळपासूनच पावसाचा जोर वाढू लागताच मुंबईत भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यासह जवळपास सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले होते. खासदार किरीट सोमय्या, भाजपा आमदार मनिषा चौधरी, पराग अळवणी, अमित साटम, योगेश सागर, राज पुरोहित, यांच्यासह भाजपा पदाधिकारी संतोष पांडे आणि सर्व जिल्हा अध्यक्ष तसेच नगरसेवक मनोज कोटक, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, अतुल शाह, संदीप पटेल असे सर्वजण रस्त्यावर उतरून मदत करत होते. आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील सर्व भाजप पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष नगरसेवक यांना प्रवासी आणि मुंबईकरांना मदत आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पोहचवण्याच्या कामात उतरण्याचे निर्देश दिले होते.


हेही वाचा - 

घाटकोपरमध्ये घराची भिंत पडून एकाचा मृत्यू


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा