Advertisement

शिवसेना मंत्र्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर


शिवसेना मंत्र्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
SHARES

शिवसनेच्या नुकत्याच झालेल्या लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरामध्ये शिवसेना मंत्र्यांमधील भांडणं चक्क चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावरच थेट टीका केली. यावेळी रामदास कदम यांनी भाजपावरही जोरदार टीका केली.
"मी दिवाकर रावतेंकडे गावासाठी एसटी मागितली तर दिली नाही. बोलतात तोट्यातला मार्ग आहे. अहो... पण आपण फायद्या-तोट्यासाठी नाही तर, शिवसैनिकांच्या सेवेसाठी आलो आहेत. हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. मला माहित आहे कि, नंतर मला शिव्याच खाव्या लागणार आहेत पण, त्याची आता सवय झाली आहे." अशा शब्दात रामदास कदम यांनी दिवाकर रावते यांना चिमटा काढला.

शिवसेनेचा एक नंबर शत्रू भाजपा - कदम

युती सडली आहे. शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू भाजपा आहे. जर आम्ही भाजपासोबत गेलो नसतो तर, आज आमचाच मुख्यमंत्री झाला असता. तुझे ते माझे आणि माझे ते माझ्या बापाचे, अशी भाजपाची अवस्था झाली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी विरुद्ध गुजराती मारवाडी अशी झाली होती. भाजपावाले तर ग्रामपंचायत सदस्यही विकत घ्यायला निघाले आहेत.

शिवसेना प्रमुखांच्या काळात गद्दारी करण्याची कुणाची हिमंत नव्हती - कदम

शिवसेनाप्रमुखांच्या काळात गद्दारी करण्याची कुणाची हिंमत नसायची. आता तिकीट नाही मिळाले तर, लगेच दुसऱ्या पक्षाचे तिकीट मिळवतात. काही माणसे तर अशी आहेत की, त्यांचा जन्म फक्त तिकिटासाठी झाला आहे की काय, असे वाटते.

रामदास कदम यांनी केलेल्या टीकेवर दिवाकर रावते यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

शिवसेना वाढीसाठी खेड्याकडे चला:संजय राऊत

शिवसेनेने महात्मा गांधी यांच्या विचारांना कधी मानले नाही. मात्र शिवसेना वाढीसाठी खेड्याकडे चला, असे सांगत संजय राऊत यांनी गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करा, असं आवाहन शिवसेना कार्यकर्त्यांना केले. गांधींचे विचार शिवसेना मानत नाही मात्र आपण गांधींजीचे एक वाक्य लक्षात ठेवले पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसंपर्काच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा