Advertisement

याकूब मेमन कबर सुशोभीकरण प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी भाजपाला केले सवाल, म्हणाले…

मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरू आहे.

याकूब मेमन कबर सुशोभीकरण प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी भाजपाला केले सवाल, म्हणाले…
SHARES

मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून (Yakub Memon) वाद सुरू आहे. यावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shivsena MLA Aaditya Thackeray) यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारनं याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विचारला आहे. याकूब मेमनची अंत्ययात्रा आणि अंत्यविधीसाठी तत्कालीन भाजप सरकारनं परवागनी कशी दिली, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

याकूब मेमनच्या कबरीचा आणि पालिकेचा काहीही संबंध नाही. स्वत:च्या चूकीचं खापर दुसऱ्याचा डोक्यावर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ती जागा खाजगी ट्रस्टची आहे. याकूब मेमनचा दफन विधी झाला तेव्हा भाजपचं सरकार होतं.

त्यावेळी दहशतवाद्याचा दफन विधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कसाबप्रमाणे याकूब मेमनला दहशवाद्यासारखी वागणूक का नाही दिली. याकूबचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

विरोधकांकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांन केली आहे. राजकारण करतानाही पातळी ठरवायला हवी. धार्मिक प्रकरणावरून वाद निर्माण करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना म्हटलं होतं की, ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे. भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने सुशोभिकरणं केले त्यांना शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही मग हे कसं केलं. याचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे कॉम्प्रमाईज का केलं याचे उत्तर द्यायला हवे, असं बावनकुळे म्हणाले.

ज्याने मुंबईला छिन्न विच्छिन्न केले त्याची कबर सुशोभित करणे तिला सजवणे योग्य नाही. सरकार कारवाई करेल पण ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली. त्यामुळे यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी. राज्याच्या जनतेची माफी उद्धव ठाकरे यांनी मागावी. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक घटनांचे समर्थन केले असे कबूल केलं पाहिजे, असंही बावनकुळे म्हणाले.



हेही वाचा

‘शिवसेना भवन’ जवळच शिंदे गटाचे मुख्यालय, जागेची शोधाशोध सुरू

सत्तासंघर्षाची लढाई पुढे ढकलली, 27 सप्टेंबरला पुढील सुनावणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा