Advertisement

शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ दिल्लीत


शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ दिल्लीत
SHARES

मुंबई - शेतकारी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मंत्र्यांचे शिष्टमंडळ नवी दिल्लीला पोहोचले आहे. या शिष्टमंडळात दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम, सुभाष देसाई यांचा सहभाग आहे. तसेच शिवसेनेचे ग्रामीण भागातील आमदार अनिल कदम यांचाही समावेश करण्यात आला आहे.

शिवसेनेचे मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी आग्रही आहेत. मात्र पंतप्रधानांची भेट न झाल्यास केंद्रीय कृषीमंत्री आणि अर्थमंत्र्यांची भेट हे शिष्टमंडळ घेण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये होणारी बैठकीचे पडसाद शनिवारी विधिमंडळात पडणार आहेत. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीसाठी दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांचाही सहभाग आहे. बैठक सकारात्मक झाली नाही तर अर्थसंकल्प गोंधळामध्ये मांडावा लागणार. शिवसेनेचे नेते आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांना विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडताना स्वपक्षीय आमदारांच्या घोषणाबाजीला सामोरे जावे लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा