बोरिवलीत भाजपमध्ये सर्वपक्षीय इनकमिंग!


  • बोरिवलीत भाजपमध्ये सर्वपक्षीय इनकमिंग!
SHARE

बोरीवली (पू.) येथील दौलतनगरच्या पॅराडाइज सभागृहात रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची उपस्थिती होती. तेव्हा शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या वृषाली बागवे यांच्यासह गज्या साळवी, मनसेचे विवेक भोईर आणि काँग्रेसचे प्रकाश उदेशींसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

वृषाली बागवे या 2012 च्या पालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 3 मधून शिवसेनेकडून उमेद्वारी मिळवत निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला होता. गज्या साळवी यांनी 2017 च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेचे विवेक भोईर, काँग्रेसचे प्रकाश उदेशी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या