Advertisement

राणे सोडून शिवसेनेचा कुणालाही पाठिंबा?


राणे सोडून शिवसेनेचा कुणालाही पाठिंबा?
SHARES

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना सोडून इतर कुणालाही विधानपरिषद निवडणुकीसाठी पाठिंबा द्यायला शिवसेना तयार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. येत्या ७ डिसेंबरला विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी नारायण राणे उमेदवारी भरणार की त्यांच्या जागी माधव भांडारींची वर्णी लागणार? याविषयी राजकीय वर्तुळामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.


काय घडलं चंद्रकांत पाटील-उद्धव ठाकरेंच्या भेटीत?

दरम्यान, भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भाजपच्या उमेदवाराविषयी आणि विधानपरिषद निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, या बैठकीत कोणत्याही स्वरूपाची राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर केला.


राणे सोडून कुणीही चालेल!

पाटील यांनी राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा जरी केला असला, तरी यावेळी नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम असल्यामुळे भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा मिळवण्यासाठीच चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे, 'नारायण राणे सोडून भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा द्यायला शिवसेना तयार आहे', असं आश्वासन शिवसेनेकडून पाटील यांना मिळाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.


मी राणेंबाबत चर्चा करण्याइतका मोठा नाही

दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, 'नारायण राणेंबाबत चर्चा करण्याइतका मी मोठा नेता नाही. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील', अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर दिले.



हेही वाचा

नारायण राणेंनी का घेतली मुख्यमंत्र्यांची भेट?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा