Advertisement

...तर राष्ट्रपतिपदासाठी स्वामीनाथन यांच्या नावाला शिवसेनेची पसंती


...तर राष्ट्रपतिपदासाठी स्वामीनाथन यांच्या नावाला शिवसेनेची पसंती
SHARES

जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींनी आता वेग घेतला आहे. सगळेच पक्ष आता राष्ट्रपतिपदासाठी स्वत:च्या उमेदवारावर जोर देत अाहेत. मात्र शिवसेनेने आता एक वेगळी खेळी करत भाजपाला कोंडीत पकडले आहे. राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना आमची पहिली पसंती अाहे. मात्र भागवत यांच्या नावाला कुणाची अडचण असेल तर हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.


हेही वाचा - 

अमित शाहांचे स्वागत अन् भाजपाचे शक्तिप्रदर्शन

बिनविरोध राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा 'पॉवर'गेम, पवारांच्या नावाला शिवसेनेचे समर्थन


कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्यांना पर्याय नसल्यास स्वामिनाथन यांना पर्याय माहिती आहेत का? त्यांना जर पर्याय माहिती असतील तर त्यांनाच राष्ट्रपती करावे, असेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे एखादे चांगले नाव असेल तर त्याचा विचार करू. मात्र राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आपल्याला वाटत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अमित शाह 16 ते 18 जून दरम्यान तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा