Advertisement

अॅमेझाॅनची सपशेल माघार, राज ठाकरेंविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी अर्ज

आपल्या शाॅपिंग वेबसाईटवर मराठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अॅमेझाॅनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिल्यावर अखेर उपरती झाली आहे.

अॅमेझाॅनची सपशेल माघार, राज ठाकरेंविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी अर्ज
SHARES

आपल्या शाॅपिंग वेबसाईटवर मराठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अॅमेझाॅनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिल्यावर अखेर उपरती झाली आहे. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आणि मनसे पक्षाविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचं सांगत दावा मागे घेण्यासाठी अॅमेझाॅनकडून मुंबईतील दिंडोशी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

भारतीय ग्राहकांना स्थानिक भाषांमध्ये खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देताना त्यात मराठी भाषा का नाही? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आॅनलाईन शाॅपिंग पोर्टल चालवणारी कंपनी अॅमेझाॅनला जाब विचारला होता. एवढंच नाही, तर मनसेचे अखिल चित्रे यांनी मनसैनिकांसहअॅमेझाॅनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात धडक दिली होती. संपूर्ण महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी असून इथं या भाषेचा यथोचित वापर होणं आणि व आदर राखणं बंधनकारक असल्याचं सांगितलं होतं.

मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेत अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु दोन महिने उलटूनही या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मनसेने ‘नाे मराठी, नो अॅमेझाॅन’ ही मोहीम हाती घेतली. तुम्हाला महाराष्ट्रात आमची मराठी भाषा मान्य नाही, तर महाराष्ट्रात आम्हाला तुम्ही मान्य नाही, असं अॅमेझाॅनला बजावण्यात आलं. 

हेही वाचा- ‘नो मराठी’, ‘नो अॅमेझाॅन’, मनसे पुन्हा आक्रमक

दरम्यानच्या काळात मनसेकडून (mns) व्यापार करण्यास अडचणी निर्माण केल्या जात असून वारंवार धमकावलं जात असल्याची तक्रार अॅमेझाॅनकडून करण्यात आली. पाठोपाठ मुंबईच्या पवई आणि साकीनाका परिसरातील ॲमेझॉनचं गोडाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर प्रकरण आणखीच चिघळलं. त्यानंतर अॅमेझाॅनने न्यायालयात धाव घेऊनही मनसेने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली होती. 

अखेर अ‍ॅमेझॉनने माघार घेत आपल्या वेबसाईटवर मराठीचा पर्याय लवकरच उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. सोबतच मनसे आणि राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात दाखल केलेले दावे मागे घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंविरोधात कुठलीही तक्रार नाही, असं सांगत अ‍ॅमेझॉनने मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी मुंबईतील दिंडोशी न्यायालयात न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालय लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे.

(shopping portal amazon to withdraws case against mns chief raj thackeray)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा