शॉटगनचा पुन्हा भाजपावर निशाणा


SHARE

मुंबई - भाजपा खासदार आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी नोटबंदीच्या निर्णयाचा विरोध केलाय. नोटबंदीच्या निर्णयामुळे सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करणारी ट्वीट्स शत्रुघ्न सिन्हांनी केली आहेत. पेरल्या जाणाऱ्या आणि बनावट सर्व्हेंपासून सावधान राहण्याचा सल्ला देताना सिन्हा यांनी म्हटलंय की, या विषयाचा सखोल विचार करणं गरजेचं आहे. या निर्णयामुळे गोरगरीबांना खूपच त्रास झालाय. माता-भगिनींनी वर्षानुवर्षांपासून पै-पै करून साठवलेले पैसे हा काळा पैसा कसा होऊ शकेल?

संबंधित विषय
ताज्या बातम्या