'शिवसेना नाटक करत आहे'

 Pali Hill
'शिवसेना नाटक करत आहे'

वांद्रे - खेरवाडी परिसरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी काँग्रेसनं नोटाबंदी विरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात निरुपम यांनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर किती काळे धन जमा झाले याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, असे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही संजय निरुपम यांनी केली.

दरम्यान यावेळी नोटाबंदीबाबत संजय निरूपम यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही टीका केली. सत्तेत राहून सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणं हे शिवसेनेचं नाटक असल्याचा आरोप निरूपम यांनी यावेळी बोलताना केला. जर विरोधच असेल तर शिवसेना अजूनही सत्तेत का आहे असा सवाल त्यांनी केला.

Loading Comments