शिक्षण समिती अध्यक्षपदी शुभदा गुडेकर बिनविरोध

  BMC
  शिक्षण समिती अध्यक्षपदी शुभदा गुडेकर बिनविरोध
  मुंबई  -  

  मुंबई - महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसच्या वतीने कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे गुडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नगरसेविका शुभदा गुडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज महापालिका चिटणीस यांच्याकडे सादर केला होता. परंतु विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेस आपला उमेदवार न दिल्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे जाहीर झाले होते. परंतु मंगळवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. 

  पिठासीन अधिकारी म्हणून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भूमिका बजावली. शुभदा गुडेकर या कांदिवली चारकोपमधून शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. 2002, 2007 आणि आता मार्च 2017 च्या निवडणुकीत त्या नगरसेवक म्हणून तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. मार्च 2012 च्या निवडणुकीत प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्या प्रभागात शिवसेनेचे श्रीकांत कवठणकर हे निवडून आले होते. गुडेकर यांनी यापूर्वी आरोग्य समिती अध्यक्षपद भूषवले असून त्या शिक्षण आणि स्थायी समिती सदस्य राहिल्या होत्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.