वाहतुकीच्या नियमांची पोस्टरबाजी

 Dadar
वाहतुकीच्या नियमांची पोस्टरबाजी

दादर - मराठा क्रांती (मूक) मोर्चाची जनजागृती बाइक रॅली रविवारी मुंबई शहरात काढण्यात आली. ज्या प्रकारे महाराष्ट्रभर मराठ्यांनी वाहतुकीचे नियम पाळत मराठा मूक मोर्चातून वेगळेपण जपले. तसंच मुंबई शहरातही हे नियम आणि वेगळेपण जपले जावे यासाठी दादर विभागात ठिकठिकाणी पोस्टर लावून वाहतुकीच्या नियमांचे पालन करा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या पोस्टरमध्ये रॅलीचं नेतृत्व महिला करतील, हॉर्न वाजवू नये, कुठल्याही घोषणा देऊ नयेत, प्रत्येक बाइकसोबत भगवा झेंडा असावा, वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावं, बाइक चालकांनी हेल्मेट वापरावे या सूचना देण्यात आल्या होत्या.

Loading Comments