मराठा क्रांती महामोर्चा बाईक रॅली

 Kandivali
मराठा क्रांती महामोर्चा बाईक रॅली

कोकणनगर - ठाण्यामध्ये रविवारी होणाऱ्या मराठा क्रांती (मूक) महामोर्चासाठी भांडूपमधून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. भांडूपच्या लाला शेठ कंपाऊंडमधून निघणाऱ्या या बाईक रॅलीसाठी आतापर्यत ५० बाईकस्वारांची नोंदणी करण्यात आल्याचं अमित परब यांनी सांगितले. ठाण्यात होणारा महामोर्चा सकाळी दहा वाजता सुरू होणार असल्याने त्या आधी ही बाईक रॅली संपूर्ण भांडूपमध्ये फिरून नंतर ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहे. या रॅलीच्या मार्गाची आखणी, तसंच बाईक रॅलीसाठी सभासद नोंदणी आणि इतर उपाययोजनांसाठी शिवाजी तलावाजवळ असलेल्या पराग विद्यालयात शनिवारी सायंकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

Loading Comments