वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती

Pratiksha Nagar
वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती
वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती
वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती
वाजपेयींच्या वाढदिवसानिमित्त महाआरती
See all
मुंबई  -  

शीव - भाजपा वॉर्ड क्र.172च्या वतीनं दीर्घायुषी महाआरती संकल्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शीव तलाव, चुनाभट्टी येथे रविवारी हा कार्यक्रम झाला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त ही महाआरती झाली.

या महाआरतीत हरिद्वारचे आचार्य गुलाब शुक्ला आणि सहकाऱ्यांद्वारे प्रतीकात्मक गंगापूजन करण्यात आलं. या ऐतिहासिक तलावाचं सुशोभीकरण, तो सुंदर आणि स्वच्छ ठेवून तलावातल्या जीवांचं संरक्षण करण्याचा संकल्पही करण्यात आला.
कार्यक्रमास भाजपा वॉर्ड क्र. १७२ चे सर्व पदाधिकारी, सभासद, उपस्थित होते. या निमित्तानं भजनसंध्या कार्यक्रम गुरुकुल म्युझिक अकदमीच्या वतीनं सादर झाला.आम्ही केलेले संकल्प पूर्ण करू. तलावाचं दूषित पाणी स्वच्छ करून जलाभिषेक करू, असं भाजप जिल्हा सरचिटणीस राजेश शिरवाडकर यांनी सांगितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.