Advertisement

डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम दोन महिन्यांत सुरू करा - बडोले


डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम दोन महिन्यांत सुरू करा - बडोले
SHARES

इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी दिले. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बडोले बोलत होते.


काय म्हणाले बडोले?

यावेळी बडोले म्हणाले, स्मारकाच्या कामकाजासंदर्भात मागवण्यात आलेल्या निविदेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने या संदर्भात नव्याने अल्प कालावधी देऊन निविदा मागवण्यात येऊन ही प्रकिया पूर्ण करावी. तसेच इंदू मिल येथे स्मारकाची माहिती देणारे डिजिटल बोर्ड ६ डिसेंबर पूर्वी लावण्यात यावे, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. त्याचसोबत तेथे स्मारकाची प्रतिकृती (मॉडल) ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. 


सर्वात उंच पुतळा

हे स्मारक जागतिक दर्जाचे करण्यात येणार असून, या स्मारकाच्या ठिकाणी उभारण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा राहणार असल्याने याचे काम उत्तम रितीने व्हावे, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना बडोले यांनी यावेळी दिल्या.


सर्व परवानग्या मिळाल्या

या स्मारकाच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, यासाठी लागणारा निधी उपलब्ध असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, स्मारकाचे आर्किटेक्ट शशी प्रभू, एमएमआरडीएचे अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



हेही वाचा -

इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरीत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा