Advertisement

Video: उद्धव ठाकरेंनी भाजपला लाथ मारली हे चांगलंच केलं- अबू आझमी


Video: उद्धव ठाकरेंनी भाजपला लाथ मारली हे चांगलंच केलं- अबू आझमी
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) अयोध्येला (ayodhya) जाणार असतील, तर मी देखील त्यांच्यासोबत अयोध्येला जाईन. अयोध्येला जाऊन ते राम मंदिर (ayodhya ram mandir) बांधणार असतील, तरी आम्ही तिथं बाबरी मशीद (babri masjid) बांधू, असं वादग्रस्त वक्तव्य करून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (abu azmi) यांचे चिरंजीव फरहान आझमी यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. यामुळे आपल्या मुलाच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत अबू आझमी यांना सारवासारव करावी लागली आहे.

हेही वाचा- ‘तर, अयोध्येत उद्धव ठाकरेंसोबत मी देखील जाणार’- फरहान आझमी

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) अत्यंत उत्तम प्रकारे काम करत असून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी भाजपला (bjp) लाथ मारून काँग्रेस (congress), राष्ट्रवादीसोबत (ncp) मिळून सरकार स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे. त्यामुळे हे सरकार केवळ ५ वर्षे नाही, तर १० वर्षे चालावं अशी आमची इच्छा आहे. राहिला प्रश्न फरहान आझमी (farhan azmi) यांच्या वक्तव्याचा तर तो माझा मुलगा असला, तरी त्याचा समाजवादी पक्षाशी कुठलाही संबंध नाही. हे पूर्णपणे त्याचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे त्याच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. बाबरी मशिद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिलेला आहे. या संदर्भात मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्ड (muslim personal law board) जी भूमिका घेईल, त्याला माझ्यासकट देशभरातील मुस्लिम समुदायाचा पाठिंबा असेल. परंतु फरहानने तिथं जाऊन बाबरी मशिद बांधण्याचं केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, अशा शब्दांत अबू आझमी यांनी हा खुलासा केला आहे.     

जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) अयोध्येला (ayodhya) जाणार असतील, तर मी देखील त्यांच्यासोबत अयोध्येला जाईन. उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन राम मंदिर (ayodhya ram mandir) बांधणार असतील, तरी आम्ही तिथं बाबरी मशीद (babri masjid) बांधू. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय केवळ मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी जगभरात २०५ अब्ज लोकसंख्या आहे. त्यात ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त मुस्लिम देश (muslim country) आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशात परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य फरहान आझमी (farhan azmi) यांनी केलं होतं. 

हेही वाचा- किती बालहट्ट पुरवायचे? आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

पुढं बोलताना त्यांनी शिवसेनेवरही (shivsena) टीका केली. ते म्हणाले, सध्या संपूर्ण शिवसेनेमध्ये फक्त उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हेच लायक आहेत. परंतु त्यांच्या शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुकीत मतं मिळाली. असं असूनही भाजपला सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेससोबत (congress) मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. परंतु शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाचं हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. टिकलंच तर जास्तीत जास्त ६ ते ८ महिने टिकेल, असा दावाही फरहान यांनी यावेळी केला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा