महाविकास आघाडीतील (maha vikas aghadi) नेत्यांच्या बेजबाबदार आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसलेली असताना या आघाडीत सामील मित्रपक्षांच्या नेत्यांचाही तोल सुटत चालल्याचं दिसत आहे. समाजवादी पक्षाचे नेेते अबू आझमी ( samajwadi party leader abu azmi) यांचे चिरंजीव फरहान आझमी (farhan azmi) यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करत या डोकेदुखीत आणखी भर टाकली आहे.
महाविकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi) १०० दिवस पूर्ण झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. भाजप-शिवसेनेत सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला बेबनाव आणि नंतर महाविकास आघाडी सरकारची स्थापना यामुळे उद्धव ठाकरेंना अयोध्या दौरा करता आला नव्हता. येत्या ७ मार्च रोजी ते अयोध्येला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा- किती बालहट्ट पुरवायचे? आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला
त्यानुसार जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) अयोध्येला (ayodhya) जाणार असतील, तर मी देखील त्यांच्यासोबत अयोध्येला जाईन. उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन राम मंदिर (ayodhya ram mandir) बांधणार असतील, तरी आम्ही तिथं बाबरी मशीद (babri masjid) बांधू. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याचा निर्णय केवळ मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी जगभरात २०५ अब्ज लोकसंख्या आहे. त्यात ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त मुस्लिम देश (muslim country) आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशात परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य फरहान आझमी (farhan azmi) यांनी केलं.
Farhan Azmi, son of Samajwadi Party (SP) Maharashtra leader Abu Azmi: If being the Chief Minister, Uddhav Thackeray says he is going to Ayodhya on 7th March, I will also go with him. He will build lord Ram's Temple & we will build Babri Masjid. (27.01.20) pic.twitter.com/InTAJ37cOy
— ANI (@ANI) January 30, 2020
पुढं बोलताना त्यांनी शिवसेनेवरही (shivsena) टीका केली. ते म्हणाले, सध्या संपूर्ण शिवसेनेमध्ये फक्त उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हेच लायक आहेत. परंतु त्यांच्या शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुकीत मतं मिळाली. असं असूनही भाजपला सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी (ncp) आणि काँग्रेससोबत (congress) मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. परंतु शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाचं हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. टिकलंच तर जास्तीत जास्त ६ ते ८ महिने टिकेल, असा दावाही फरहान यांनी यावेळी केला.
हेही वाचा- 'या' मार्गावरून निघणार मनसेचा मोर्चा, परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज
फरहान आझमी (farhan azmi) यांच्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते यावरून हा वाद किती भडकणार हे अवलंबून असणार आहे.