Advertisement

किती बालहट्ट पुरवायचे? आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

भाजपचे नेते आशिष शेलार (Bjp mla ashish shelar) यांनी ट्विटरवरून राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते ​आदित्य ठाकरे ​​​(environment minister aaditya thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

किती बालहट्ट पुरवायचे? आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला
SHARES

पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाइफचा (mumbai night life) निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!, अशा शब्दांत भाजपचे नेते आशिष शेलार (Bjp mla ashish shelar) यांनी ट्विटरवरून राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (environment minister aaditya thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा- मुनगंटीवारांना पडताहेत ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’

मुंबईतील वादग्रस्त मेट्रो ३ चं (metro 3) आरे कारशेड (aarey car shed) शहरातील इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नसल्याचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या ४ सदस्यीय समितीने (committee report) नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्याकडे सोपवला आहे. आरे सोडून कांजूरमार्ग (kanjur marg) किंवा इतर ठिकाणी मेट्रो ३ चं कारशेड (metro 3 car shed) हलवल्यास सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा बोजा पडणार आहे. वाढणारा खर्च, प्रकल्पाला होणारा उशीर आणि इतर अडथळे टाळण्यासाठी मेट्रो ३ चं कारशेड आरेमध्येच व्हावं शिवाय कारशेडच्या कामावर लावण्यात आलेली स्थगिती हटवण्याची शिफारसही समितीने केली आहे.

या अहवालावर प्रतिक्रिया देताना समितीने सोपवलेला हा अहवाल (committee report) मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात (cmo) पोहोचला आहे. हा अहवाल अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिलेला नाही. या अहवालाचा योग्य रितीने अभ्यास करूनच कारशेडबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. हा अहवाल स्वीकारणं राज्य सरकारसाठी बंधनकारक नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. 

हेही वाचा- बालहट्ट पुरवण्यासाठीच ‘नाईटलाइफ’चा निर्णय?, प्रविण दरेकरांचा सवाल

तसंच याआधी आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील नाईटलाइफवरही भाजपकडून टीका करण्यात आली होती. मुंबईत पोलिसांची (mumbai police) संख्या आधीच कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीच कामाचा ताण-तणाव असतो. त्यातच ‘नाईटलाइफ’ सुरु झाल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढून त्याचा परिणाम मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर होईल, अशी चिंता व्यक्त करत भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांचा हट्ट पुरवण्यासाठीच ‘नाईटलाइफ’चा निर्णय घेण्यात आला आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. 

या दोन्ही निर्णयांवरुन आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा