Advertisement

मुनगंटीवारांना पडताहेत ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’

शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतंच केलं होतं.

मुनगंटीवारांना पडताहेत ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’
SHARES

शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप शिवसेनेसोबत (shiv sena and bjp allience) मिळून सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (bjp mla sudhir mungantiwar) यांनी नुकतंच केलं होतं. मुनगंटीवारांचं हे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असल्याचं म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुनगंटीवारांना टोला लगावला आहे.

काँग्रेसने (congress) शिवसेनेला पाठिंबा देणं हे २१ व्या शतकातील आश्चर्य आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस या आघाडीत सामील झाली, हे अशोक चव्हाण (ashok chavan) यांचं म्हणणं खरं आहे. पण यामुळे मुंबईतल्या शक्तीशाली मातोश्रींचा (matoshree) शक्तीपात होऊन दिल्लीतील मातोश्री शक्तीशाली झाल्या. हे तिन्ही पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. भिन्न विचारांचं सरकार फारकाळ टिकत नाही, असा इतिहास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकारही (maha vikas aghadi) फार काळ टिकणार नाही, असा दावा मुनगंटीवार यांनी केला होता.

हेही वाचा- शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र, सुधीर मुनगंटीवार

समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची (bjp) भूमिका आहे. सध्या तरी मनसेला (mns) सोबत घेण्याची आवश्यकता नाही. तसा प्रसतावही मनसेकडून आलेला नाही. पण शिवसेना (shiv sena) आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने आताही प्रस्ताव दिल्यास सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. देर आये दुरूस्त आये, सुबह का भुला श्याम को आया, असं आम्ही समजू. असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दाखवली. 

त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (pwd minister ashok chavan) यांनी मुनगंटीवारांना सध्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पडत असल्याचं म्हणत टोला लगावला.

तर हे शहाणपण भाजपला आधी का सुचलं नाही? खरं तर भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपची शिवसेनेसोबत जायची तयारी असली, तरी शिवसेना भाजपला सोबत घेणार का? हे शिवसेनेला विचारलं पाहिजे. शिवसेनेने कमळाबाईला सोडलं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (minorty development minister nawab malik) यांनी दिली.

हेही वाचा- ‘जाणता राजा’ ही उपाधी शरद पवारांना कशी चालते? मुनगंटीवारांचा प्रश्न

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा