Advertisement

‘जाणता राजा’ ही उपाधी शरद पवारांना कशी चालते? मुनगंटीवारांचा प्रश्न

विरोधकांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांना दिलेली कशी चालते? असा प्रश्न उपस्थित केला.

‘जाणता राजा’ ही उपाधी शरद पवारांना कशी चालते? मुनगंटीवारांचा प्रश्न
SHARES

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भाजपला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्यावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांना दिलेली कशी चालते? असा प्रश्न उपस्थित केला. 

हेही वाचा- गोयल कधीतरी मुंबईत येतील, मनसेचा इशारा

या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी दिली गेली आहे. पण हीच उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. शरद पवारांच्या कार्यकाळात तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा त्यांना ही उपाधी लागू होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांची बदनामी केली होती. पण त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिल्यावर वाद मिटला होता. ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

हेही वाचा- म्हणून केली मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना, लेखकाचा खुलासा
 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा