Advertisement

सूर्य नमस्काराविरोधात 'सपा'चे जनआंदोलन


सूर्य नमस्काराविरोधात 'सपा'चे जनआंदोलन
SHARES

मुंबई - महानगर पालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार आणि योगा बंधनकारक करण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने जोरदार विरोध दर्शवला आहे. समाजवादी पक्षाने सूर्यनमस्कार आणि योगा बंधनकारक करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र निर्णय रद्द होत नसल्याने सपाने जनआंदोलन छेडले आहे. यावेळी त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे न्यायालयीन लढाईचीही तयारी सुरू केली आहे. त्यानुसार येत्या आठवड्याभरात याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सपाचे गटनेते रईस शेख यांनी दिली आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय