उमेदवार..जरा हटके!

Mumbai
उमेदवार..जरा हटके!
उमेदवार..जरा हटके!
उमेदवार..जरा हटके!
उमेदवार..जरा हटके!
उमेदवार..जरा हटके!
See all
मुंबई  -  

मुंबई - 21 तारखेला मंगळवारी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महत्त्वपूर्ण म्हणून समजल्या जाणाऱ्या पालिका निवडणुकीवर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मुंबई पालिका निवडणुकीत काही हटके उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

हे आहेत हटके उमेदवार -

पराग शाह - 690 कोटी संपत्तीचे मालक असणारे पराग शाह घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपामधून निवडणूक लढवत आहेत.

पराग शाह रिअल इस्टेटचे व्यापारी असून, ते काँग्रेसच्या प्रविण छेडा यांच्या विरोधात उभे आहेत.

जयंत दांडेकर - विक्रोळीच्या प्रभाग क्रमांक 118 मधून मनसेच्या तिकिटावर जयंत दांडेकर नशीब आजमावत आहेत. दांडेकर हे त्यांच्या उंचीवरून चर्चेत आहेत. जयंत दांडेकर यांची उंची 3 फूट आहे.

55 वर्षीय जयंत दांडेकर यांनी आजवर या प्रभागात अनेक समाजिक कामे केली असून, पाणी आणि आरोग्य हे महत्त्वाचे मुद्दे त्यांचे आहेत.

प्रिया पाटील - किन्नर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रिया पाटील कुर्ला परिसरातील प्रभाग क्रमांक 186 मधून निवडणूक लढवत आहेत.

किन्नर माँ ट्रस्टतर्फे प्रिया पाटील पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.

 

मयुर मोरये - कंबाटा एविएशनमध्ये काही वर्षांपूर्वी नोकरी करणारा मयुर मोरये यंदा प्रभाग क्रमांक 77मधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विशेष म्हणजे मयुर मोरये याला त्याचे मित्र निवडणुकीसाठी सर्वतोपरी मदत करत आहेत. प्रचाराच्या खर्चापासून ते उमेदवारी अर्जासाठी लागणाऱ्या पैशाची मदत मयुरला त्याच्या मित्रांनी केली आहे.

विनोद अरगिले - प्रभाग क्रमांक 213 मधून मनसेकडून विनोद अरगिले निवडणूक लढवत आहेत. जन्मजात अंध असलेल्या विनोद अरगिले यांनी आजवर अनेक संघर्षाचा सामना केला.

मात्र आता निवडणूक लढवत त्यांना समाजाची सेवा करायची आहे. वाढते अतिक्रमण आणि युवा वर्गाला सशक्त करणे हे त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.