Advertisement

मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना जारी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन
SHARES

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व अटी मान्य करत मराठा आरक्षण देण्याचे ठाम आश्वासन देत अधिसूचना जारी केली होती. आता 15 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल अधिवेशनात मांडला जाणार आहे. नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा होण्याची शक्यता आहे. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार

राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, मनोज जरांगे पुन्हा 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. आरक्षण कायदा मंजूर करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा आमरण उपोषण करणार आहेत.

मराठा समाजाला कायद्याच्या कक्षेत कायमस्वरूपी आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात छगन भुजबळ म्हणाले की, "15,16 तारखेला विधानसभेचं अधिवेशन होणार असून, माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मराठा आरक्षणासाठी वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. वेगळा कायदा बनवला जात आहे. आम्हीतर आधीपासून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीला धक्का लागता कामा नये असं सांगत आहोत."

मनोज जरांगे पाटील यांनी आपण मंडल आयोगाला विरोध कऱणार नाही. पण जर छगन भुजबळांनी अध्यादेशाला विरोध केला तर मात्र मंडल आयोगाला विरोध करु असं म्हटलं आहे. 



हेही वाचा

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

"बाबरी मशिदीची एक वीट माझ्याकडे आली, आता राम मंदिराची..." - राज ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा