Advertisement

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेस पक्षाला रामराम
SHARES

मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election )आधी मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.  

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे. 

बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीआधी त्यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती. 



हेही वाचा

शरद पवारांचा पक्ष आता 'या' नावाने ओळखला जाणार

भाजप-मनसे युती होण्याच्या चर्चांना उधाण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा