शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने

  Pali Hill
  शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने
  मुंबई  -  

  मुंबई - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना-भाजपमधील वाद दिवसेंदिवस वाढल्याचं पाहायला मिळतंय. मेट्रो प्रकल्पावरून आधीच शिवसेना-भाजपमध्ये जुंपली असून, आता हा वाद आणखी चिघळलाय. बुधवारी वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रोसाठी झाडे तोडण्याच्या प्रस्तावावरून शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. या प्रस्तावाला शिवसेनेने जोरदार विरोध करत हा प्रस्ताव रोखून धरला. मेट्रोसाठी स्थानकांसाठी गिरगाव, काळबादेवी परिसरातील 38 झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान आयत्यावेळी प्रस्ताव आणत प्रस्ताव मंजुर करून घेण्याचा पायंडा पालिका प्रशासनाकडून केला जात असल्याचं सांगत शिवसेना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी प्रस्तावाला विरोध केला. विशेष म्हणजे भाजप वगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा दिल्यानं भाजप एकटेच पडले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.