सफाई कामगारांना मिळणार निवारा


  • सफाई कामगारांना मिळणार निवारा
  • सफाई कामगारांना मिळणार निवारा
  • सफाई कामगारांना मिळणार निवारा
SHARE

फोर्ट - मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या वसाहत पुनर्निमाण कामाचा शुभारंभ आणि भुमिपूजन सोहळा रविवारी पार पडला. शिवसेना नगरसेवक गणेश सानप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामाचा शुभांरभ झाला. कोचीन स्ट्रीटमधील सर्व स्थलांतरीत 136 कुटुंबियांना परत फोर्टमधील पूर्नविकासानंतर आश्रय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिका आश्रय योजनेअंतर्गत स्थायी समितीने पुर्नविकासासाठी 9 कोटी 21 लाख निधी मंजूर केलीय. कोचीन स्ट्रीटमधील सफाई कामगार गेले 12 वर्ष सायन येथील संक्रमण शिबिरात गैरसोयीचा सामना करत विस्थापितांचे जीवन जगत होते.

या भुमीपूजन सोहळ्याला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार अरविंद सावंत, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, उपनेते राजकुमार बाफना, युवासेना समनव्यक सुनील देसाई, कुलाबा विधानसभा संघटिका सुवर्णा शेवाळे आणि नगरसेवक गणेश सानप उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या