भारतातील प्रत्येक शासकीय कामासाठी वापरण्यात येणा-या राजमुद्रेचा गैरवापर करणा-यांवर यापुढे कारवाई करण्यात येईल. भारतातील प्रत्येक शासकीय कामासाठी राजमुद्रेचा रबरी स्टॅम्प वापरला जातो. मात्र उमटणारा ठसा अस्पष्ट असल्याने राजमुद्रेचा अपमान होतो. रोजगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नवीन लादे यांनी निवेदन पत्राद्वारे भारत सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर भारत सरकारने 129 दिवसात या निवेदनाची दखल घेत देशातील प्रत्येक राज्यांना यापुढे असे प्रकार कुठेही घडल्यास शासन निर्णय (जीआर) काढण्याचे आदेश दिले.