Advertisement

राज्यमंत्री दर्जा प्राप्त होऊनही पाशा पटेल यांना स्वतंत्र केबिन नाही


राज्यमंत्री दर्जा प्राप्त होऊनही पाशा पटेल यांना स्वतंत्र केबिन नाही
SHARES

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपाचे माजी आमदार पाशा पटेल यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्याचे आदेश राज्य सरकारने नुकतेच जारी केले होते. मात्र १० दिवस उलटूनही त्यांना मंत्रालयात स्वतंत्र केबिन देण्यात आलेली नाही.


सदाभाऊंच्या कार्यालयातूनच कामकाज 

विशेष म्हणजे पाशा पटेल हे सध्या आठवड्यातून २ दिवस कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कार्यालयातून कामकाज सांभाळत आहेत. पाशा पटेल यांना सदाभाऊ खोत यांच्या स्वीय सहाय्यकांची केबिन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच केबिनमध्ये बसून पटेल काम करत आहेत.


मी सध्या सदाभाऊ खोत यांच्या कार्यालयात बसत आहे. येथे मला बसण्यासाठी केबिनची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र केबिन मिळावी, अशी मागणी केली असून १-२ दिवसांत यावर निर्णय होईल. त्यानंतर मी सरकारने दिलेल्या केबिनमध्ये बसेन.

- पाशा पटेल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष


म्हणून अध्यक्षपदावर नियुक्ती

राज्यातील शेतीमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतीमाल खरेदी करता यावा, या उद्देशाने राज्य सरकारने २०१५ मध्ये "राज्य शेतमाल भाव समिती' स्थापन केली होती. कालांतराने समितीचं रुपांतरण राज्य कृषी मूल्य आयोगात करण्यात आलं. १ जुलै २०१७ रोजी राज्य शासनाने पाशा पटेल यांची या आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्‍ती केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा