Advertisement

ई-मराठीला प्रोत्साहन, सरकारचा विकिपीडियासोबत उपक्रम


ई-मराठीला प्रोत्साहन, सरकारचा विकिपीडियासोबत उपक्रम
SHARES

महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि ई-माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर होण्यासाठी विकिपीडियासोबत विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा दिनी ही घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली.


काय असेल उपक्रम?

जगभरातील मराठी भाषिकांशी जोडणारा हा महत्वाकांक्षी उपक्रम असेल. भारताबाहेर स्थायिक मराठी बांधवांना महाराष्ट्रासोबतच मराठी भाषेसोबत जोडण्याचा व्यापक प्रयत्न यातून केला जाईल.

विकिपीडियाच्या माध्यमातून विविध ब्लॉग लेखनासाठी भारताबाहेरील मराठी बांधवांना प्रोत्साहित करणे, आपल्या मूळ जन्मगावाशी संबंधित लेखन करणे आदी उपक्रम याअंतर्गत राबविण्यात येणार असून, विकिपीडियातर्फे प्रोजेक्ट पेजवर त्यांचा विशेष उल्लेख करण्यात येईल.


महाराष्ट्र पाहिलं राज्य

अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार असून न्यूयॉर्कमध्ये मराठीच्या अधिकृत प्रसाराचं दालन यातून खुले होणार आहे. विकिपीडियाच्या माध्यमातून मराठी भाषिकांना जोडणारा हा भाषिक वर्गवारीतील पहिला उपक्रम असेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा