• नवी शिखरं सर करुया, निर्धार करुया !
SHARE

शिवाजी पार्क - गुरुवारी 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ध्वजारोहण केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, परिवहन मंत्री दिवाकर रावते, विनायक मेटे, महापौर स्नेहल आंबेकर इतर नेतेमंडळी उपस्थित होती. भविष्यात विकासाची सतत नवीन शिखरे गाठण्याचा आपण सर्वजण निर्धार करूया असे आवाहन या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं.

या वेळी भारतीय नौदल, तटरक्षक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्यासह मुंबईतल्या विविध शाळा-कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी संचलन केलं. यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे चित्ररथही यामध्ये होते. प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या