Advertisement

राणे सुधारले असतील तर भाजपाने घ्यावे - केसरकर


राणे सुधारले असतील तर भाजपाने घ्यावे - केसरकर
SHARES

नारायण राणे सुधारले असतील तर भाजपाने खात्री करून त्यांना घ्यावे, आम्ही काहीही म्हणणार नाही असा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपाला दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे त्यावर केसरकरांनी ही प्रतिक्रिया दिली.

कोकणात त्यांचे प्राबल्य वाढले हा राणे यांचा दावा खोटा आहे. कोकणात भाजपा-शिवसेनेने चार नगरपालिका जिंकल्या. राणे मालवण नगरपालिका हरले आहेत. त्यांनी एकच नगरपंचायत जिंकली आहे. कोकणात शिवसेना-भाजपा एकत्र आले तर राणेंचा उपयोग होत नाही. पण त्यांचा कसा वापर करावा याबद्दल मी कोणालाही सल्ला देणार नाही 

- दीपक केसरकर, गृहराज्यंमत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राणे एका गाडीतून अहमदाबादमध्ये फिरले होते याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोकणात मी तत्वाची लढाई लढत आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. राणेंनी स्वत:ला सुधारले पाहिजे असं सांगत त्यांनी राणेंवर तोंडसुख घेतले.

तर दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सध्या कोणतीही निवडणूक नाही त्यामुळे सध्या कुणाचाही पक्ष प्रवेश होतील असे मला वाटत नसल्याचे सांगितले. 

आमच्या पक्षामध्ये चांगली पद्धत ठरवली आहे की, आपल्याला जी खोली दिली आहे ती खोली स्वच्छ ठेवायची. दुसऱ्यांच्या खोलीमध्ये डोकवायचे नाही. नारायण राणे प्रवेश नावाची खोली आहे आणि त्यात मला डोकवायचे नाही 

- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा