'बाबांना' राज्य सरकारचा ठेंगा

Pali Hill
'बाबांना' राज्य सरकारचा ठेंगा
'बाबांना' राज्य सरकारचा ठेंगा
See all
मुंबई  -  

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माहिती अधिकारात मागवलेली माहिती देण्यास राज्य सरकारनं नकार देत चक्क ठेंगा दाखवलाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी माहितीच्या आधाराखाली तैवानमधील फॉक्सकॉन कंपनीबरोबर झालेल्या सामंजस्य कराराची माहिती मागवली होती. मात्र ही माहिती जाहीर केल्यास त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहचू शकेल आणि ही माहिती व्यापक हिताच्या दृष्टीने जाहीर करणे योग्य ठरणार नसल्याचं पत्र त्यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आलंय. त्याचबरोबर माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 8(1)(क), (घ), (ड) व कलम 11 च्या नियमानुसार नाकारण्यात आला आहे असेही त्यात नमूद केलंय. याबाबत प्रथम अपिलीय अधिकार्याकडे जाण्याचा सल्लाही देण्यात आलाय. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, ही कंपनी सध्या राज्यात गुंतवणूक करण्यास तयार नाही अशी माहिती त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच राज्य सरकार मात्र गुंतवणूकीचे पोकळ आकडे, रोजगाराच्या फसव्या जाहीराती करण्यात मग्न असल्याची त्यांनी टीका केलीय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.