Advertisement

मुंब्रात मनसेच्या शाखेवर दगडफेक, राज ठाकरेंच्या सभेआधी चिंतेचं वातावरण

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हाती घेतलं आहे.

मुंब्रात मनसेच्या शाखेवर दगडफेक, राज ठाकरेंच्या सभेआधी चिंतेचं वातावरण
SHARES

मुंब्रा इथल्या डुमरीपाडा परिसरातल्या मनसेच्या शाखेवर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तीन जणांनी या शाखेवर दगडफेक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हाती घेतलं आहे.

दरम्यान दगडफेक करणारे नेमके कोण होते याची माहिती मिळालेली नाही. पण या घटनेमुळे राज ठाकरेंच्या सभेआधी वाद होण्याची चिन्हं आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भोंगे न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिली आहे.

दुसरीकडे त्यांनी मदरशांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचाही आरोप केला. यानंतर होणाऱ्या आरोपांना राज ठाकरे आता ठाण्यात सभा घेत उत्तर देणार आहेत.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ठाण्यातील ९ एप्रिलला होणारी सभा आता १२ एप्रिलला होणार आहे. या सभेवरून आणि ठिकाणावरून वाद निर्माण झाल्यानं आता ही सभा १२ एप्रिलला होणार आहे. ही सभा ठाण्यातील तलावपाळी या ठिकाणी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेच्या ठिकाणावरुन वाद निर्माण झाला होता. गेल्या वेळी गडकरी रंगायतनजवळ राज ठाकरेंची सभा झाली होती. या वेळी त्याला लागून असलेल्या तलावपाळी या ठिकाणी ही सभा घेणाचा प्रस्ताव मनसेकडून पोलिसांना देण्यात आला होता. पण या ठिकाणी ९ तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आता १२ तारखेला होणार असल्याची माहिती मनसेच्या वतीनं देण्यात आली आहे.



हेही वाचा

राज ठाकरेंची ठाण्यातील ९ एप्रिलची सभा पुढे ढकलली, आता 'या' तारखेला होणार

यशवंत जाधवांना झटका, ४१ मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा