Advertisement

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, सुरक्षेत त्रुटी असल्याचा पक्षाचा आरोप

आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, सुरक्षेत त्रुटी असल्याचा पक्षाचा आरोप
file photo
SHARES

मंगळवारी सायंकाळी पक्षाच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान औरंगाबादच्या वैजापूर भागात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही "असामाजिक तत्व" उपस्थित असल्यामुळे पोलिसांनी मिरवणूक थांबवली आणि मिरवणुकीतील काही सदस्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.

आदित्य यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांच्या ताफ्यावर काही दगडफेक करण्यात आल्याचेही समोर येत आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “एक दगड सभास्थळाच्या आत पडला. आम्ही घटनास्थळावरून बाहेर पडत असताना, जमाव स्थानिक आमदार रमेश बोनारे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होता, जमावातील काही समाजकंटकांकडून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता.

"शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केली दगडफेक"

आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती यांची भेट होणार आहे. त्यांना एकजूट होऊ नये यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक हा कट रचल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारने त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी दानवे यांनी केली.



हेही वाचा

काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

जाहिरातबाजीवर शिंदे-फडणवीस सरकारचा कोट्यवधींचा खर्च! RTIमधून माहिती उघड

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा