Advertisement

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधानभवनाबाहेर आंदोलन


SHARES

विधानभवन - तूरडाळ आणि कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी विधानभवनाच्या गेटवरच आंदोलन केले. तर काही कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या कारवर कांदे फेकले.

या वेळी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची देखील झाली. त्यामुळे पोलिसांनी स्वाभिमानीच्या राजू शेंट्टींबरोबर काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. 

दुसरीकडे स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाढलेले अंतर दिसून आले. 'हे आंदोलन कोणाविरोधात नाही तर शेतकऱ्यांसाठी असल्याची प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली'.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा