स्वाभिमानीचा सरकार विरोधात एल्गार

 CST
स्वाभिमानीचा सरकार विरोधात एल्गार

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी मुंबईमध्ये आत्मक्लेश पद्यात्रा काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले होते. ही आत्मक्लेश पद्यात्रा सकाळी चेंबूर येथून सुरू होऊन आझाद मैदानाच्या दिशेने पुढे गेली.

कर्जमाफी, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या, शेती पंपांना 24 तास वीजपुरवठा करा, शेतकऱ्यांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून मुक्त करा, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ही आत्मक्लेश पद्यात्रा काढण्यात आली होती.

Loading Comments