Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचं निधन

दादरच्या बालमोहन विद्यालयात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह दिग्गजांना त्यांनी शिकवलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचं निधन
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचं निधन झालंय. ९२ वर्षीय सुमन रणदिवे यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.

सुमन रणदिवे या वसईच्या सत्पाळा गावातील ‘न्यू लाईफ फाऊंडेशन’ या वृद्धाश्रमात राहत होत्या. दादरच्या बालमोहन विद्यालयात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह दिग्गजांना त्यांनी शिकवलं. त्यांच्यावर विरारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन रणदिवे दादरमधील बालमोहन विद्यामंदिरात शिक्षिका होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्यांनी शिकवलं होतं.

१९९१ मध्ये त्या निवृत्त झाल्या. पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर सुमन रणदिवे यांनी वृद्धाश्रमात आश्रय घेतला. वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ केअर” या वृद्धाश्रमात त्या राहत होत्या.

२०२१च्या मे महिन्यात राज्याला तौते चक्रिवादळाचा फटका बसला होता. तेव्हा सुमन रणदिवे राहत असलेल्या या वृद्धाश्रमाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यावेळी सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्र्याकडे मदतीची मागणी केली होती.

“चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. छप्पर उडालं असल्याने आम्हाला रात्री झोपायला त्रास होतो. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी शिकवलं होतं. कृपया आम्हाला मदत कर”, अशी आर्त हाक सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती.

त्यानंतर मनसे आणि शिवसेनेसह सामाजिक संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला होता.



हेही वाचा

वातावरण कृती आराखडा तयार करणारे मुंबई हे पहिले शहर - उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता राहणार - संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा