उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav thackaray) यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्यावतीने लीना गरड (lina garad) यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी राजीनामा दिला आहे. तसेच नाराज पदाधिकाऱ्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा जाहीर प्रचार सूरू केला.
निवडणुकीला अवघे 12 दिवस शिल्लक असताना स्थानिक शिवसैनिकांची सुटलेली साथ लीना गरड यांना परवडणारी नाही. तसेच लीना गरड या प्रचारात पिछाडीवर आणि एकाकी पडल्याचे चित्र आहे.
साडेतीन लाख मालमत्ता करदात्यांपैकी अडीच लाख करदात्यांनी अजूनही कर पालिकेला दिला नसल्याने कर न भरणा-यांचा गरड यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
6 लाख 52 हजार 62 मतदारांपर्यंत पोहचणे लीना गरड यांना पुढील काही दिवसात अशक्य असल्याचे दिसून येत आहे. मात्र यादरम्यान गुरुवारी लीना गरड यांची भेट कामोठे येथील शिवसेनेच्या (shiv sena) शाखेत सेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी घेतली तसेच पुढील प्रचारासाठी शुभेच्छाही दिल्या.
अनेक शिवसैनिकांनी लीना गरड यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पनवेलच्या उमेदवारीमुळे नाराजी व्यक्त न करता गप्प बसण्याची भूमिका घेतली आहे. मात्र शिवसैनिकांची ही मते बाळाराम पाटील यांच्या पदरात पडण्यासाठी शेकापचे पदाधिकारी आग्रही आहेत.
निवडणूकीला 12 दिवस शिल्लक असताना शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेचा आशिर्वाद मिळेल असा आशावाद व्यक्त केला आहे. एकाकी पडलेल्या लीना गरड यांनी कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल (panvel) आणि खारघर (kharghar) येथील शहरी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा