Advertisement

युतीबाबत काय ते स्पष्ट करा - उद्धव ठाकरे


युतीबाबत काय ते स्पष्ट करा - उद्धव ठाकरे
SHARES

मुंबई - महानगरपालिका निवडणुकीत युती करायची आहे की नाही, याबाबत काय ते एकदाचं स्पष्ट करा, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ठणकावून सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'युतीचा प्रस्ताव आल्यास या वेळी नक्की विचार करू,' असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुुळामध्ये युतीबाबत चर्चेलाही उधाण आलं. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी ही भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे यांच्या विधानानंतर शिवसेना-मनसेच्या युतीची शक्यता जोरदार चर्चेत आहे. दुसरीकडे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भाजपा नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबईसह इतर ठिकाणी युतीचा मुद्दाही चर्चेत होता. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीसाठी अनुकूलता दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे. तर काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या रंगशारदामध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युती होणार तर फक्त भाजपाशी, नाहीतर कुणाशीच नाही, अशी भूमिका मांडली होती.
जास्त दिवस हातात नाहीत - उद्धव ठाकरे
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की, महापालिका निवडणुकीला जास्त दिवस राहिलेले नाहीत. निवडणूक आयोग कधीही पालिका निवडणुकीची घोषणा करेल. त्यामुळे युतीबाबत आम्हाला काय ते स्पष्ट सांगा, नाही तर निवडणूक होऊन जाईल. मात्र, राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
युती व्हावी ही तर...
शिवसेना आणि भाजपामध्ये हे वाकयुद्ध सुरू आहे आणि दोन्ही पक्षांची युती व्हावी अशी इच्छाही आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपा वरचढ झाल्यानं, किती जागा, हाच युतीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. तर मनसेची मुंबईतली ताकद कमी झाल्यामुळे त्यांच्या रेल्वे इंजिनालाही स्टेशनाची म्हणजे युतीची गरज भासू लागली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा